भुसावळ- शहरातील रेणुका माता दुकानाजवळ योगेंद्र गणेश भंगाळे (38, रा.श्रीराम नगर, भुसावळ) बेकायदा देशी दारू बाळगून त्याची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी संशयीतास अटक केली. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी, नाईक सुनील थोरात, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, किशोर महाजन, श्रीकृष्ण देशमुख आदींनी ही कारवाई केली. आरोपीच्या ताब्यातून देशी टँगो कंपनीच्या दोन हजार 496 रुपये किंमतीच्या 48 बाटल्या जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.