भुसावळात बोगस डॉक्टरवर कारवाई

0

भुसावळ । कुठलीही अधिकृत पदवी नसताना अनाधिकृतरित्या शडरात रुग्णांवर उपचार करीत असलेल्या बोगस डॉक्टरची तपासणी करण्यात आली असता वैद्यकिय पदवी आढळून न आल्याने रुग्णालयास सील करण्यात आल्याची कारवाई शनिवारी सकाळी करण्यात आली.

काझी प्लॉट भागातील गोपाळ पाटील यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायाची पदवी नसताना ते 10 वर्षांपासून रुग्णांवर उपचार करीत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात आली़ नगरपालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ़. कीर्ती फलटणकर, प्रभारी आरोग्याधिकारी अशोक फालक, प्रदीप पवार, वसंत राठोड यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली़ जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकार्‍यांनी पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना पत्र पाठवून दवाखाना सील करण्याची कारवाई करण्याचे कळवले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली़. या बोगस वैद्यकीय व्यावसायिकाचा दवाखाना पंचांसमक्ष सील करण्यात आला.