भुसावळात बोरखेडा हत्याकांड प्रकरणी नोडल अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फन्सींगव्दारे नोंदवली साक्ष !

भुसावळ प्रतिनिधी दि 20

रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारातील हत्याकांड प्रकरणी भुसावळ सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी दोन नोडल ऑफिसरची व्हिडीओ कॉन्फन्सींगदार साक्ष नोंदविण्यात आली तसेच अंगझडती पंच व मुख्य साक्षीदार अशा चार साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.

 

या खटल्यात आतापर्यंत १९ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली आहे.अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून चौधा भावंडाची हत्या करण्यात आल्याची घटना रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारात १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडली असून या हत्याकांडातील आरोपी अद्यापही कारागृहात आहे. भुसावळ सत्र न्यायालयाने या खटल्याची सुनावणी सुरू आहे. बोरखेडा शिवारातील शेतात 15 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री दोन मुले, दोन मुली अशांची हत्या करण्यात आली होती. हत्येपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला व त्याचवेळी अन्य भावंडांना जाग आल्याने त्यांचीदेखील हत्या करण्यात आली. सोमवारी विशेष सरकारी वकिल अँड.उज्वल निकम यांनी साक्षीदारांची सरतपासणी घेतली तर आरोपीतर्फे अॅड. सत्यनारायण पाल यांनी उलट तपासणीचे कामकाज पाहिले.

 

या खटल्याची पुढील सरतपासणी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे