भुसावळात भरदिवसा घरफोडी ; 15 हजारांचा ऐवज लंपास

0

भुसावळ- शहरातील मयुरेश्‍वर अपार्टमेंटमध्ये घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी भर दिवसा घरफोडी करीत 15 हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी संकल्प रमेश मंगल (35, रा.मयुरेश्‍वर अपार्टमेंट, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 8 मे रोजी सकाळी 10 ते सव्वा चार दरम्यान घर बंद असल्याची चोरट्यांनी संधी साधत दहा हजार रुपये रोख, पाच हजारांचा मोबाईल लांबवला. तपास ईकबाल तडवी करीत आहेत.