भुसावळ: शहरातील जाम मोहल्ला, फकिरवाडा भागातील रहिवासी व व्यापारी असलेल्या शेख कय्युम शेख शरीफ (33) हे कुटुंबासह लग्नाला गेल्याने चोरट्यांनी संधी साधत मंगळवारी भरदिवसा सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी 50 हजारांची रोकड तसेच पाच ग्रॅम किंमतीच्या अंगठ्या तसेच 30 तोळे वजनाचे चांदीचे कडे मिळून 68 हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अली सत्तारअली करीत आहेत.