भुसावळात भरधाव आयशर कंटेनरवर आदळला : चालक जखमी

भुसावळ : भरधाव आयशर वाहन कंटेनरवर आदळून झालेल्या अपघातात आयशर चालक जखमी झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलावर मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडला. बाजारपेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातात आयशर चालक जखमी
मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाण पूलावर जळगावकडे जाणारी आयश (एम.एच.04 के.यु.2912) ही गाडी भरधाव वेगाने जात असताना कंटेनर (आर.जे.32 जी.सी.2602) वद आदळल्याने आयशर चालक रीयाज जखमी झाला तर अपघातानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली. रात्री तीन वाजेनंतर महामार्गावरील ठप्प झालेली वाहतूक सुरळीत झाली. बाजारपेठ पोलिस ठाण्यात शब्बीर इसराईल मेहू (रा. मुलका, ता. उत्तावर, जि. पलवल, हरियाणा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयशर गाडी चालक रीयाज मुस्कीकीम अन्सारी (रा.अमनारी, ता. झरपो, टायीझरिया, झारखंड) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.