जुना सातार्यात अपघात ; हुडको कॉलनीत शोककळा
भुसावळ: जुना सातारा भागातून जाणार्या भरधाव ट्रकचा कट लागल्याने 17 वर्षीय शाळकरी युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. यश उर्फ वेदांत भालचंद्र दिवेकर (17, हुडको कॉलनी, भुसावळ) असे मयत युवकाचे नाव आहे. के.नारखेडे विद्यालयात तो दुचाकी (एम.एच.19 बी.आर.9249) ने जात असताना कच वाहून नेणारा भरधाव ट्रक (एम.एच.19 झेड.7273) ने धडक दिल्याने वेदांत हा मागच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला. अपघातानंतर बराचवेळानंतर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी धाव घेतली.
जुना सातार्यात अपघातांची मालिका
आधीच रूंद असलेल्या जुना सातारा भागात रस्त्यावरच फळविक्रेते गाड्या लावत असून त्यातच या भागातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहनधारक खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यातून अनेकदा अपघात होतात शिवाय या भागातून अहोरात्र अवैधरीत्या वाळूसह गौण खनिजाची वाहतूक होत असताना तहसील व महसूल प्रशासन हातावर हात ठेवून असल्याने शहरवासीयांमध्ये तीव्र संताप आहे.