भुसावळात भरधाव ट्रक उलटला ; सोड्याच्या गोण्या आल्या रस्त्यावर

0

भुसावळ- रावेरकडून जळगावकडे जाणारा भरधाव ट्रक शहरात उलटल्याची घटना शनिवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत ट्रकमधील सोड्याच्या गोण्या रस्त्यावर आल्या तर ट्रक चालक गंभीर जखमी झाला. शहर पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत चालकाला उपचारार्थ हलवले. रावेरकडून जळगावकडे सोड्याच्या गोण्या घेऊन जाणारी ट्रक (जी.जे.04 ए.डब्ल्यू.7778) शहरातून जळगावकडे रात्री एक वाजेच्या सुमारास जात असताना मामाजी टॉकीजजवळील सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याजवळ ट्रक उलटला. ट्रक चालक रामभाई यादव (42, रा.गुजराथ) यास मध्यरात्री डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. चालकाच्या डोक्याला व डोळ्याच्या खालील बाजूस मोठ्या प्रमाणावर मार लागल्याचे सूत्रांनी सांगितले. रात्री अपघात झाल्याचे वृत्त कळताच पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी, संजय पाटील, मोहंमद वली सय्यद आदींनी भेट देऊन पाहणी केली.