राष्ट्रीय महामार्गावरील घटना : चालकास पाठलाग करून पकडले
भुसावळ- भरधाव ट्रालाने पादचार्यास चिरडल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 46 वरील हॉटेल पालखीसमोर बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या अपघातानंतर ट्राला चालकाने पळ काढला मात्र काही वाहनधारकांसह पोलिसांनी पाठलाग करून टोल नाक्यावर ट्राला थांबवून चालकास ताब्यात घेतले.
अनोळखी पादचार्याला चिरडले
रस्त्यावरून पायी चालणार्या 40 वर्षीय अनोळखी पादचार्यास जळगावकडून वरणगावकडे जाणारा ट्राला (पी.बी.07 टी.ए.4976) ने जोरदार धडक दिल्याने अनोळखी ईसमाचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी जोरदार होती की अनोळखी इसमाचा चेहर्याचा चेंदामेंदा झाल्याने त्याची ओळख पटवणेही कठीण झाले. बाजारपेठ पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एएसआय आनंदसिंग पाटील, विकास सातदिवे, प्रकाश बर्डे, यासीन पिंजारी, हवालदार तस्लीम पठाण आदींनी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला असून धडक देणार्या वाहनास टोल नाक्यावर पकडण्यात आले तर चालकासही ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.