धनश्री गॅस एजन्सीसमोरील घटना ; ट्रक चालकास अटक
भुसावळ : भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार दोघे गंभीर जखमी झाले. 25 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे. संदेश झांबरे व राहुल कुलकर्णी हे दुचाकीने जात असताना फिरोज समा अफजलभाई समा (गुजराथ) यांच्या ट्रकने धडक दिल्याने दोघे जखमी झाले. तपास एएसआय आनंदसिंग पाटील करीत आहेत.