भुसावळ : भुसावळातील भाजपचे सत्ताधारी गटनेते मुन्ना तेली यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा वर्तुळात खळबळ उडाली. या राजीनाम्याला अनेक कंगोरे आहेत. माजी मंत्री खडसे यांनी भाजपाला रामराम केल्यानंतर अनेक समर्थक राष्ट्रवादीत गेले आहेत तर भाजपाच्या तिकीटावर विद्यमान असलेल्या मात्र मनाने खडसेंसोबत असलेल्यांना अद्याप काही दिवस पक्ष चिन्हाची अडचण आहे. त्यातच तेली यांनी राजीनामा दिला आहे त्यामुळे भुसावळात आगामी काळात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगेल हे स्पष्ट आहे.
मुन्ना तेली मूळात अपक्ष नगरसेवक
2016 च्या पालिका निवडणूकीत मुन्ना तेली यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत 25 भाजप, 3 अपक्ष व एक लोकनियुक्त नगराध्यक्ष असा 29 जणांना गट तयार करुन या गटाचे गटनेते म्हणून मुन्ना तेली यांची निवड करण्यात आली मात्र गेल्या काही दिवसांत सत्ताधारी भाजपमध्ये अनेक गट तट निर्माण झाले आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्यानंतर भाजपच्या बर्याच नगरसेवकांच्या परीवारातील सदस्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. सध्या पालिकेत सत्ताधारी नगरसेवकांची कामे होत नाहीत, असा आरोप केला जातो. यासर्व परीस्थितीची किनारही मुन्ना तेली यांच्या राजीनाम्याला आहे. खाजगी कामे वाढल्याने राजीनामा दिल्याचे मुन्ना तेली यांनी सांगितले असलेतरी त्यांच्या राजीनाम्यामागे अनेक कारणे आहेत. भुसावळ पालिकेच्या निवडणुकीत आगामी काळात काय-काय फटाके फुटतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.