भुसावळात भाजप पदाधिकाऱ्यांवर बंदी; कार्यकर्त्यांनी वाटले पत्रक !

0

जळगाव: भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीवेळी भुसावळ शहराध्यक्ष निवडीवरून वाद झाला. सरचिटणीस सुनिल नेवे यांच्यावर शाईफेक करण्यात येऊन त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर आता भुसावळात भाजप पदाधिकाऱ्यांना बंदी घालण्यात आल्याचे पत्रक बैठकीत वाटण्यात आले. सुनिल नेवे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून व स्वत:च्या मर्जीतील कर्तव्यशून्य व्यक्तीची भुसावळ शहराध्यक्षपदी नेमणूक केल्याबद्दल धिक्कार या पत्रकातून करण्यात आले आहे. ही निवड आजच रद्द करा अशी मागणी करण्यात आली आहे. ही निवड रद्द होत नाही तोपर्यंत भुसावळात कोणत्याही जिल्हा पदाधिकारी यांनी येऊ नये असे पत्रकातून सांगण्यात आले आहे.

भाजप नेते मंत्री रावसाहेब दानवे, आमदार सुजित सिंह ठाकूर, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थित हा प्रकार घडला आहे.