भुसावळ– शहरातील गंगाराम प्लॉट भागातील रहिवासी असलेल्या भाजीपाला विक्रेत्याने काहीतरी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. कैलास शिवाजी चौधरी (46, गंगाराम प्लॉट, भुसावळ) असे मयताचे नाव असल्याचे शहर पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी सांगितले. चौधरी यांचा मृतदेह सोमवारी रात्रीपासून लोणारी मंगल कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे रूळाजवळ रात्रभर पडून असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. घटनेची माहिती कळताच शहर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सारीका खैरनार व कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट दिली.