भुसावळ : भारत-चीन दरम्यान झालेल्या संघर्षात गलवान खोर्यात झालेल्या चकमकीनंतर भारताचे 20 जवान शहिद झाले होते. या शहिद जवाहनांना भुसावळ विधानसभा युवा काँग्रेस अध्यक्ष इमरान खान, इद्रीस खान व त्यांच्या सहकारी मित्र परीवाराने मेणबत्ती प्रज्वलीत करून आदरांजली वाहिली. यावेळी अमीर खान इद्रीस खान, शेख मुस्ताक अहमद, शेख सिराज, कलीम भाई, तन्वीर खान, शेख शोएब, इरफान मणियार, साबीर शॉह, शेख कासीम आदी उपस्थित होते.