भुसावळात भारिपतर्फे धरणे आंदोलन

0
भुसावळ : भीमा-कोरेगाव घटनेतील तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत,  3 जानेवारीच्या बंदमध्ये सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांवरीलही गुन्हे मागे यासह अन्य मागण्यांसाठी भारिपतर्फे शनिवारी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.
भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष दिनेश इखारे, शहराध्यक्ष गणेश इंगळे, जिल्हा सचिव गोपीचंद सुरवाडे, संजय सुरळकर, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष संजय कांडेलकर, विश्‍वनाथ मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.