भुसावळ : शहरातील संतोषी माता सभागृहात मंगळवारी भोरगाव लेवा पंचायतीतर्फे मंगळवारी सामूहिक विवाह सोहळा झाला. प्रसंगी दहा जोडपी विवाह बंधनात अडकली. विवाहापूर्वी जोडप्यांचे समुपदेशन करण्यात आले व त्यानंतर त्यांनी एकमेकांचे जीवनभर आयुष्याचे साथीदार होण्याचा निर्णय घेतला. मंगळवार, 19 एप्रिल रोजी भोरगाव लेवा पंचायतीतर्फे दहा वधू-वरांचे वैदिक पध्दतीने विनामूल्य विवाह लावण्यात आला. संस्थेतर्फे प्रत्येक जोडप्याला गॅस शेगडी, सिलेंडर, मिक्सर, कुकर, संसारोपयोगी साहित्य व आंदण वितरीत करण्यात आले. सामाजिक समस्या व खर्चिक लग्न पध्दतीला फाटा देत या विवाह सोहळ्याचे मंगळवारी आयोजन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
विवाह सोहळ्याला कुटुंबनायक रमेश विठू पाटील, भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेचे अध्यक्ष अॅड.प्रकाश पाटील, सचिव डॉ.बाळू पाटील, प्रोजेक्ट चेअरमन आरती चौधरी, स्वागताध्यक्ष सुहास चौधरी, माजी आमदार नीळकंठ फालक, महेश फालक, मंगला पाटील, शरद फेगडे, रघुनाथ चौधरी, डिगंबर महाजन, भावी कुटुंबनायक ललित रमेश पाटील उपस्थित होते. प्राची राणे, महेश मधुकर चौधरी (खिरोदा), ललित महाजन (चिखली), सुधीर काशीनाथ चौधरी (अंजाळे), दिनेश राणे, वासुभाऊ इंगळे, प्रमोद धनगर, मनोज जावळे, अरुण पाचपांडे यांनी सहकार्य केले. डॉ.प्रिया सरोदे (सावदा) यांनी 10 जोडप्यांना भेटवस्तू दिल्या. अनंत जोशी, राहुल जोशी, खुशाल जोशी यांनी वैदिक पध्दतीने लग्नविधी केले. या प्रसंगी जळगावचे माजी महापौर व जळगाव भोरगावचे अध्यक्ष विष्णू भंगाळे, ललित पाटील, डॉ. वर्षां कोळंबे, वैशाली भगत, जळगाव भोर पंचायतच्या नीला चौधरी, किरण चौधरी, अर्चना पाटील, सुनंदा चौधरी, शालिनी पाटील, विकास पाचपांडे, सुनीता पाचपांडे आदी उपस्थित होत्या.
या जोडप्यांचा झाला विवाह
संजय उमाकांत फेगडे-प्रियांका, भूषण निवृत्ती वारके-काजल गणेश फिरके, वैभव चंद्रकांत सरोदे-शिल्पा प्रल्हाद होले, सुरज सोपान बढे-वैष्णवी राजेंद्र सासले, नंदकिशोर फेगडे-ऐश्वर्या मनवाडे, रोषण कोल्हे-मोहिनी नेहते, देवेश पाटील- प्रियांका चौधरी, दीपक बढे-खुशबू, उमेश संतोष पाटील-चंद्रकला तानाजी लंके, उल्हास तुकाराम महाजन-सपना दिवाकर भोळे यांचा समावेश होता. विनीत हंबर्डीकर, उल्हास महाजन, नेहल लढे, दीपक चौधरी यांनी परीश्रम घेतले.
नात्यात संवाद महत्वाचा : आरती चौधरी
कोणत्याही नात्यात संवाद महत्वाचा असतो. हे नवदांपत्याने लक्षात ठेवावे तर ते नाते फुलते, असे समुपदेशन कक्षाच्या आरती चौधरी समुपदेशनात म्हणाल्या. एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांच्या प्रती आदर ठेवून नात्याची सुरवात केली तर त्या नात्यामधे प्रेम वाढते, असेही त्या म्हणाल्या.