भुसावळ : मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील 35 वर्षीय पीडीतेचे भुसावळातील महिलेशी एका प्रकरणात वाद झाल्यानंतर दोघांनी सोमवारी सायंकाळी बाजारपेठ पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी दोघांची समजुत काढल्यानंतर 35 वर्षीय पीडीत महिला गावी जाण्यासाठी निघाल्यानंतर 25 ते 30 वयोगटातील संशयीत आरोपीने महिलेला दुचाकीवर बसवून महामार्गावरील ट्रामा केअर सेंटरवरील निर्जनस्थळी नेत मारहाण करीत अत्याचार केला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षकांची धाव
या घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा.अधीक्षक अर्चित चांडक, शहरेच निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, बाजारपेठ सहा.निरीक्षक अनिल मोरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक म्हणाले.