समाजाला आरक्षण देण्याची मागणी : घोषणांनी परीसर दणाणला
भुसावळ- मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासह विविध मागण्यांसाठीमराठा क्रांती मोर्चातर्फे शहरातील प्रांताधिकारी कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलकांच्या घोषणाबाजीने प्रांताधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी भर पावसात प्रांताधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहरासह तालुक्यातील मराठा समाजबांधव, समाजातील राजकिय पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
यांची होती उपस्थिती
कृष्णा शिंदे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, संजय कदम, नरेश पाटील, रवी देवपूजे, गजू पवार, जिल्हा परीषदेचे सदस्य रवींद्र पाटील, रवी ढगे, पितांबर पाटील, संजय शिंदे, दिलीप शृंगारे, पवन ओजळे, सतीश ओगले, शुभम शिंदे, किशोर शिंदे, जगदिश राऊत, श्रीकांत बरकले, युवराज वामते, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, चेतन मोहिते, शैलेश ठाकरे, गणेश बरकले, सुकदेव बावस्कर आदींसह समाजबांधव, विविध सामाजिक, राजकीय संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.