भुसावळात मराठा समाजातील गुणवंतांचा 15 रोजी सत्कार

0

भुसावळ- राजर्षी शाहु महाराज बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे समाजातील गुणवंतांचा स्वातंत्र्यदिनी गौरव करण्यात येणार आहे. शहरातील जळगाव रोडवरील लोणारी समाज मंगल कार्यालयात होणार्‍या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावेरचे माजी आमदार अरुण पाटील असतील. उद्घाटक जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील असतील. याप्रसंगी डेक्कन ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन रतीराम सीताराम पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष जे.के.पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विशाल पाटील, दीपनगरातील बीटीपीएस विभागातील व्यवस्थापक राजेश पवार आदींची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम बावस्कर, अध्यक्ष अशोक चौधरी, उपाध्यक्ष प्रा.पंकज पाटील, सचिव के.यु.पाटील, सहसचिव अरुण पाटील आदींनी केले आहे.