यात्रोत्सवानिमित्त मार्ग बंद ; हजारो भाविकांची मंदिरात दर्शनार्थ गर्दी
भुसावळ- शहरातील सतारे भागातील जुना सतारे भागातील ग्रामदैवत मरीमातेच्या यात्रोत्सवानिमित्त शनिवार, 6 रोजी सायंकाळी सहा वाजता बारागाड्या ओढण्यात आल्या. गुढी पाडव्यानिमित्त मरीमाता यात्रोत्सवाची शतकोत्तर वर्षांची परंपरा असून जळगाव रोडवरील गुरुद्वारा ते जुना सतारे भागातील मरीमाता मंदिरापर्यंत भगत प्रमोद वाघुळदे व भगले देवेंद्र सपकाळे, सागर ठोके यांच्यासह हजारो भाविकांच्या उपस्थिती
बारागाड्या ओढण्यात आल्या. यावेळी शहर पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला होता. दरम्यान, भुसावळ-जळगाव मार्गावरील जुना सातारा भागात मरीमातेचे मंदिर असल्याने दुपारनंतर या भागातून वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली तर जड वाहनांना अन्य मार्गाने वळवण्यात आले.
बारागाड्यांचा जल्लोष
शनिवारी, सकाळी मरिमाता मंदिरात अभिषेक, महापूजा आदी कार्यक्रम झाले. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जळगावरोडवरील गुरुव्दाराजवळील मंदिरापासून मरीमातेच्या जयघोषात बारागाड्या ओढण्यात आल्या. तत्पूर्वी ग्रामदैवताला भगतांकडून प्रदक्षिणा घालण्यात आली. यात्रोत्सवात गृहोपयोगी तसेच खाद्यपदार्थांसह खेळण्याची दुकाने थाटण्यात आली होती. यात्रोत्सवाच्या दुसर्या दिवशी अर्थात रविवारी सायंकाळी भुसावळ हायस्कूलच्या मैदानावर कुस्त्यांचे सामने रंगणार आहेत.