भुसावळात महामार्गावर दुकान फोडले : संशयीत बाजारपेठ पोलीसांच्या जाळ्यात

0

भुसावळ- शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील माळी भवन कॉम्पलेक्समधील कार डेकोरेटरच्या दुकानातून चोरट्यांनी नऊ हजार 500 रुपयांची रोकड लांबवली होती. या प्रकरणी निलेश सुरेश भालेराव (35, रा.पांडुरंग नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा ाखल होता. या गुन्ह्यातील संशयीत पंचशील नगर येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर उपअधीक्षक गजानन राठोड, पोलीस निरीक्षकचंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जयराम खोडपे, नाईक सुनील थोरात, कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, दीपक जाधव, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, राहुल चौधरी आदींनी कुणाल वामन इंगळे (25, रा.पंचशील नगर, भुसावळ) यास अटक केली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.