भुसावळात महाराणा प्रताप जयंतीचा उत्साह

0

प्रतिमा पूजनासह विविध कार्यक्रमांचे आयेाजन

भुसावळ- क्रांतीसूर्य महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शहरातील राजपूत समाजबांधवांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शासकीय विश्रामृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमलसिंग ठाकुर होते. महाराणा प्रतापांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण, नरवीरसिंग रावळ, प्रदीपसिंग पाटील, नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटु) ठाकुर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी कमलसिंग ठाकुर, उदयसिंग ठाकूर, चंद्रकांतसिंग ठाकुर, राजेंद्रसिंग ठाकुर, सोनी ठाकुर, शंभू ठाकुर, नितीन पाटील, विशाल ठाकूर, दीपक पाटील, उद्धवसिंग ठाकुर, राजु मेहरे, कैलाश भोळे, सुमेरसिंग पाटील यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भुसावळ कारागृहात प्रतिमेचे पूजन
भुसावळ- शहरातील दुय्यम कारागृहात महाराणा प्रताप जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला. संस्कृती फाउंडेशनचे संस्थाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी मार्गदर्शन केले. गेल्या तीन वर्षांपासून महाराणा प्रताप जयंती कारागृहात साजरी केली जाते. कैद्यांना एक प्रेरणा मिळावी हा उद्देश संस्थेचा असतो. कार्यक्रमात महाराणा प्रताप ह्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कैद्यांना फळ वाटप करण्यात आले. संस्कृती फाउंडेशनचे स्वयंसेवक अजयसिंग पाटील, शुभम पाटील, तुषार गोसावी, दर्शन पाटील, पवन कोळी, संस्कार मालविया आदी उपस्थित होते.