भुसावळात महिला काँग्रेस कमिटीतर्फे ‘मनुस्मृती’चे दहन

0
भुसावळ : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीतर्फे शहरातील नेहरू मैदानावर शनिवारी मनुस्मृती दहन दिवस साजरा करण्यात आला. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृती ग्रंथाचे दहन करत मनुस्मृती दहन दिन व स्त्रीमुक्ती दिन साजरा केला होता. या दिवसाचे स्मरण करून शनिवारी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, भुसावळ शहर महिला काँग्रेस, जिल्हा युविका काँग्रेस सेल व भुसावळ शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे हा दिन साजरा झाला.
कार्यक्रमास या पदाधिकार्‍यांची होती उपस्थिती
 जनरल सचिव अनिता खरारे, शहराध्यक्ष रवींद्र निकम, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा कल्पना तायडे, डॉ.सुवर्णा गाडेकर, कविता गरूड, निकिता नीळे, रश्मी तुरकेले, सरचिटणीस रहिम कुरेशी, सलीम गवळी, संजय खडसे, रोहित तुरकेले, विजय तुरकेले यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी परीश्रम घेतले.