भुसावळात मार्च एण्डमुळे बँकांमध्ये उशिरापर्यंत चालणार कामकाज

0

भुसावळ- रविवारी बँकांना साप्ताहिक सुट्टी असलेतरी मार्च एण्ड तसेच रीझर्व्ह बँकेच्या आदेशामुळे शहरातील सर्वच बँकांमध्ये रात्री उशिरापर्यंत रविवारी कामकाजाची धावपळ चालणार आहे. 2018-19 मधील वित्तीय हिशोब 31 मार्चलाच संपवावे, असे पत्रक भारतीय रीझर्व्ह बँकेकडून काढण्यात आलं आहे. या वर्षाची काम, कराचे हिशोब 31 मार्चपर्यंत संपवा, असे निर्देश केंद्र सरकारने रीझर्व्ह बँकेला दिल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. दोन दिवसांत ही कामे संपून जावीत म्हणून सरकारी बँका रात्री आठपर्यंत सुरू राहिल्या तर सोमवारी संध्याकाळी सहापर्यंत सुरू राहणार आहेत. शासकीय करांचा भरणा करण्यात आला असला तरी रविवारी व सोममारी मात्र सामान्य खातेदारांची कुठलीही कामे करण्यात आली नाही. या शिवाय आयटी रीटर्न भरण्यासह विविध करांचा भरणा करण्यासाठी गर्दी झाली होती.