भुसावळात मालगाडीखाली आल्याने 50 वर्षीय अनोळखीचा मृत्यू

भुसावळ : अप रेल्वे लाईनवर मालगाडीखाली आल्याने 50 वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 9.12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. किलोमीटर क्रमांक 474/475-39 जवळ अप रेल्वे लाईनवर रेल्वे मालगाडी इंजिन (टीपीएनएस) च्या खाली आल्याने 50 वर्षीय अनोळखीचा जागीच मृत्यू झाला. तत्पूर्वी रुग्णालयात हलवले असता डॉ.अमोल पाटील यांनी अनोळखीस मृत घोषित केले. अनोळखीची उंची 5 फूट 5 इंच, शरीराने मजबूत, चेहरा गोल, डोक्याचे केस बारीक पांढरे, अंगात फुलबाहीचा मळकट चौकडीचा शर्ट, अंगात मळकट हिरव्या रंगाची फुलपँट असे मयताचे वर्णन आहे. अनोळखीची ओळख पटत असल्यास भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात हवालदार श्याम मंगेश बोरसे (9823788499) संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.