भुसावळ- शहरातील माळी समाज भवनात श्री संत सावता माळी मंडळातर्फे सावता माळी पुण्यतिथीनिमित्त समाजाील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव शुक्रवार, 10 रोजी करण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परीषदेचे माजी सदस्य डॉ.वसंतराव झारखंडे होत तर अतिथी म्हणून भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण हजारे, भुसावळ कारागृहाचे निरीक्षक जितेंद्र माळी, उद्योजक शिवाजी पाटील, नगरसेवक संतोष (दाढी) चौधरी होते.
समाजासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पुजनाने झाली. यावेळी समाजातील पंच्यात्तरी पार करणार्या बांधवा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. अहवाल वाचन गजेंद्र महाजन यांनी केले. या कार्यक्रमात मंडळाने समाज बांधवांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू केले असून त्याची शुक्रवारी नोंदणी सुरू करण्यात आली. प्रसंगी रामकृष्ण माळी, शैलेश माळी, सुरेश महाजन, शशिकांत माळी, वाघमारे, दशरथ सोनवणे, राजू माळी, योगेश महाजन, ईश्वर चौधरी, अमोल महाजन, मुकूंद माळी, रमेश महाजन, दिलीप चौधरी, निलेश भोपळे आदी मान्यवरांसह समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.