भुसावळात मुलाने केली आईला बॅटने बेदम मारहाण

भुसावळ : शहरातील न्यू आंबेडकर नगरातील रहिवासी मनोज रतन सोनवणे (वय 33) याने माझे लग्न करून देत नाही म्हणून आईच्या डोक्यात बॅट मारून जखमी केल्याची घटना शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आई कल्पना रतन सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलाविरूद्ध गुन्हा दाखल झाला. या पद्धतीची ही शहरातील पहिलीच घटना आहे.

शहर पोलिसात गुन्हा दाखल
न्यू आंबेडकर नगरातील रहिवासी कल्पना रतन सोनवणे यांचा मुलगा मनोजने तू माझे लग्न करून देत नाही म्हणून आईसोबत वाद घातला. वाद विकोपाला गेल्याने मनोजने आईला बॅटने मारहाण केली.