भुसावळात मूकबधीर इसमास मारहाण : तिघांविरुद्ध गुन्हा

भुसावळ : आमच्या नांदी लागतो तसेच जास्त झाले आहे, असे म्हणत तिघा संशयीत आरोपींना मुकबधीर असलेल्या इसमाच्या डोक्यात फरशी टाकून दुखापत केल्याची घटना शहरातील रजा टॉवर, पापा नगर परीसरात 17 रोजी दुपारी साडेपाच वाजता घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फातेमा हसन अली (रजा टॉवर, पापा नगर) यांच्या तक्रारीनुसार बिल्ला, मन्या व कुर्बान (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी फिर्यादीचा मुका असलेला दीर हुसैन न्याज अली याच्या डोक्यात फरशी व लाकडी बल्ली मारून दुखापत केली तसेच फातेमा व त्यांचा मोठा दीर लिली अली यांना शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तपास हवालदार मिलिंद कंक करीत आहेत.