भुसावळात मॅरेथॉननंतरच्या अल्पोपहाराने धावपटूंना मिळाली ‘इन्स्टंट एनर्जी’

0

भुसावळ : शहरात तिसर्‍यांदा झालेल्या भव्य अशा मॅरेथॉन स्पर्धेने शहरवासीयांमध्ये रविवारची पहाट चैतन्य निर्माण करून गेली. आयोजकांनी स्पर्धकांची बडदास्त राखली असतानाच सर्व सहभागी धावपटूंसाठी भुसावळातील प्रसिद्ध अशा अष्टभूजा डेअरीचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते नितीन धांडे व त्यांच्या पत्नी व नगरसेविका मीनाक्षी नितीन धांडे यांच्यातर्फे उपम्यासह केळीचे वाटप करण्यात आले. तीन, पाच व दहा किलोमीटर अंतर धावून आलेल्या धावपटूंना या अल्पोपहाराने ‘इन्स्टंट एनर्जी’ मिळाली व त्यांनी आयोजकांसह दात्यांना ‘क्या बात है’ म्हणून दादही दिली. या शिवाय कार्यक्रमास प्रमुख म्हणून उपस्थित राहिलेल्या मान्यवरांनाही केळी, अंडी, टरबूज, ब्रेडसह चहा, कॉफी, उपमा नास्ता स्वरूपात देण्यात आला.

अनवाणी धावणार्‍या धावपटूंचा नितीन धांडेंनी केला गौरव
रन भुसावळ रन स्पर्धेत शहरातील खड्डेमय रस्त्यावरून दहा किलोमीटर अंतरासाठी अनवाणी धावणार्‍या व शर्यतीत दुसरा क्रमांक पटकावलेल्या धावपटूस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन धांडे व नगरसेविका मीनाक्षी नितीन धांडे यांच्याकडून रोख दोन हजारांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.