भुसावळात मॉडर्न रोडवर डीपी पेटली

0
व्यापार्‍यांची धावपळ ; उच्च दाबामुळे घटना
भुसावळ :- शहरातील मॉडर्न रोडवरील मोठ्या पोस्ट कार्यालयाजवळील वीज डीपी सायंकाळी सात वाजेच्या अचानक पेटल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली. डीपीवर भार वाढल्याने शॉर्टसर्किट होवून डीपीतील ऑईलने पेट घेतल्याचे समजते. आगीची घटना कळताच पालिकेच्या अग्निशमन बंबाने लागलीच धाव घेतली. स्थानिक व्यापार्‍यांनी पेटत्या डीपीवर माती टाकून आग विझवण्याचा प्रयत्नही केला.