भुसावळ- 40 हजार रुपये किंमतीच्या महागाड्या अॅपल कंपनीच्या मोबाईल चोरी प्रकरणी तीन महिन्यांपासून पसार असलेल्या क्रीष्णा प्रकाश खरारे (20, रा.मामाजी टॉकीजमागे, महात्मा फुले नगर, भुसावळ) यास अवैधशस्त्र जप्त पथकाने अटक केली. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक युवराज अहिरे, हवालदार जयराम खोडपे, सुनील थोरात, नरेंद्र चौधरी, कृष्णा देशमुख, दीपक जाधव, उमाकांत पाटील, बंटी कापडणे आदींच पथकाने ही कारवाई केली. तपास हवालदार जयराम खोडपे करीत आहेत.