भुसावळात मोर्चाने दणाणला डीआरएम कार्यालय परीसर

0
झोपडपट्टीवासीयांना पर्यायी जागेसाठी जगन सोनवणे आक्रमक
भुसावळ : शहरातील रेल्वेच्या जागेवरील झोपडपट्टी हटवण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न असून झोपडपट्टीधारकांना आधी पर्यायी जागा द्यावी वा त्यांचे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी राष्ट्रीय मजदूर सेनेचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात डीआरएम कार्यालयावर सोमवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला.
डीआरएम कार्यालयात मोर्चा धडकल्यानंतर मोर्चेकर्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने परीसर दणाणला. डीआरएम आर.के.यादव यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले. प्रसंगी आंदोलकांनी मागण्या मान्य होण्यासाठी दोन तास ठिय्या मांडला.