भुसावळात मोर्चा, आंदोलनाने गाजला दिवस
भुसावळात इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅली : गोळीबार करणार्या दरोडेखोरांच्या अटकेसाठी खाटीक समाजाचे निवेदन
भुसावळ : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने सायकल रॅली काढून केंद्र शासनाचा शहरात निषेध नोंदवला तर गोळीबार करणार्या दरोडेखोरांच्या अटकेसाठी खाटीक समाजाचे निवेदन दिले तसेच पुर्नवसित झालेल्या भागास मूलभूत सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले व राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीतर्फे खडसे कुटुंबियांना त्रास देणार्या ईडीच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले. मंगळवारचा दिवस खर्या अर्थाने मोचा व आंदोलनामुळे गाजला.
काँग्रेसच्या सायकल रॅलीने वेधले लक्ष
भुसावळ : भुसावळ शहर व तालुका काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागातर्फे जिलहाध्यक्ष मो.मुनव्वर खान, माजी आमदार निळकंठ फालक, प्रदेश महासचिव मुक्ती हारून नदवी, शहराध्यक्ष रवींद्र निकम यांच्या प्रमुख उपस्थित इंधन दरवाढीच्या निषेधार्थ महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सायकल रॅलीला सुरूवात झाली. बाजारपेठ पोलीस ठाणेमार्गे रॅली यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ पोहोचल्यानंतर सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष एम.एम.शेख यांच्या आदेशानुसार व संदीप भैय्या पाटील यांच्या नेतृत्वात पदाधिकार्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यांचा सायकल रॅलीत सहभाग
सायकल रॅलीत शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, विलास खरात, मागासवर्गीय विभाग अध्यक्ष सुनील जवरे, अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष सलिम गवळी, महिला शहराध्यक्ष यास्मीन बी.शेख तन्वीर, राम अवतार, रघुनाथ चौधरी, ज्येष्ठ कार्यकर्ता जे.बी.कोटेजा, सागर कुरेशी, दुर्गाबाई सोनवणे, जिल्हा महिला उपाध्यक्ष राणी खरात, बाळू सपकाळे, विनोद पवार, इमाम ठेकेदार, हमीद शेख, शहर उपाध्यक्ष सुजाता सपकाळे, हमीदा गवळी, रमजान खा. लोटिक इसाक चौधरी, जॉनी गवळी, वसीम शेख, शाहनवाज सलिम गवळी, नाशिक खान रशीद, कुरेशी शरीफ शहा, सुनील रायमळे, भीमराव वाघ, मुकुंदा टेलर, शहर सरचिटणीस शैलेश अहिरे व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले.