भुसावळ- शहरातील संत धाम, दुर्गा कॉलनी परीसरातील 40 वर्षीय युवकाने सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे ठोस कारण कळाले नसलेतरी नैराश्यातून या तरुणाने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पराग पांडुरंग महाले (40) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत मयताचे वडिल पांडुरंग एकनाथ जंगले यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले. सोमवारी सकाळी 7.41 वाजेच्या सुमारास परागने लहान मुलांच्या झोक्यासाठी बांधलेल्या दोराने गळफास घेतला. कुटुंबियांना घटना कळताच त्यांनी टाहो फोडला. मयताच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले असा परीवार आहे. तपास हवालदार जयेंद्र पगारे करीत आहेत.