भुसावळ – शहरातील नाहटा महाविद्यालयात जिल्हास्थरीय युवारंग मोहोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी सकाळी ९ वाजता नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते झाले.
यावेळी चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा, प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य व युवक महोत्सव समन्वयक डॉ.ए.डी.गोस्वामी, उपप्राचार्य प्रा.एन.ई.भंगाळे, प्रसिद्धीप्रमुख प्रशांत पाटील आदींची उपस्थिती होती.
25 उपकला प्रकार
नाट्य, नृत्य, साहित्य, ललीत या पाच मुख्य कला प्रकारातील 25 उपकला प्रकारात जळगाव जिल्यातील 60 महाविद्यालयातून सुमारे 600 विद्यार्थी-विद्यार्थिनी आपला कलाविष्कार सादर करीत आहेत. 60 संघव्यवस्थापक व जवळ-जवळ 150 संगीत साथीदार सहभागी आहेत.
स्वतंत्र सहा मंचावर कलाविष्कार
सर्व स्पर्धकांना कला प्रकार सादर करता येण्यासाठी स्वतंत्र सहा रंगमंच तयार करण्यात आले असून त्यांना तशी नावेही देण्यात आली आहेत. पहिल्या रंगमंचला स्व.नानासाहेब देविदासभाऊ गोविंद फालक, रंगमंच क्र. दोनला स्व.सुशीलकुमार पुनमचंद नाहाटा, रंगमंच क्र.तीनला स्व.अण्णासाहेब पांडूरंग रामचंद्र पाटी, रंगमंच क्रमांक चारला स्व.पुरुषोत्तमभाऊ सखाराम फालक, रंगमंच क्रमांक पाचला स्व.रामचंद्र विठ्ठल पाटील सभागृह, रंगमंच क्रमांक सहाला स्व.एच.एन.एस.राव यांचे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक रंगमंचावर परीक्षक, समिती प्रमुख व सदस्य यांची नेमणूक करण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजेपासून स्पर्धांना सुरुवात झाली.