सकाळी 11 वाजेपर्यंत 150 जणांनी स्वयंस्फूर्तीने लावला राष्ट्रीय कार्याला हातभार
भुसावळ – शिक्षण विभाग व संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी शहरातील सिंधी कॉलनीतील आर.एस. आदर्श हायस्कूलमध्ये सुरू असलेल्या रक्तदान शिबिरात सकाळी 11 वाजेपर्यंत सुमारे 150 वर जणांनी स्वयंस्फूर्तीने लावला राष्ट्रीय कार्याला हातभार लावत रक्तदान केले तर रक्तदान करण्यासाठी मोठी प्रमाणावर गर्दी जमली होती. सिंधी सेवा मंडळाचे सुरेश तलरेजा, गटशिक्षणाधिकारी महेंद्र धीमते, शिक्षण विस्तार अधिकारी सौमित्र अहिरे, प्रकल्पप्रमुख गणेश फेगडे यांच्यासह शेकडो शिक्षक रक्तदानस्थळी उपस्थित होते.