माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा सपत्नीक होणार गौरव
भुसावळ- आपले परीवार सार्वजनिक वाचनालय व सदगुरू धनजी महाराज प्रतिष्ठान, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 9 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कृतज्ञता ऋणानुबंध सन्मान सोहळा आणि वारकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता दिंडी सोहळा होणार असून त्यानंतर लोकनेते माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे व त्यांच्या पत्नी मंदा खडसे यांचा कृतज्ञता व ऋणानुबंध सन्मान सोहळा होणार आहे. गेल्या 40 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यासह राज्यभरामध्ये शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय व अध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्याविषयीचा ऋणानुबंध जपण्यासाठी खडसे दाम्पत्याचा सन्मान होणार आहे.
यांची राहणार उपस्थिती
या कार्यक्रमास खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, पंढरपूर मठाचे अध्यक्ष रमाकांत भारंबे, श्री क्षेत्र कुंडलेश्वर येथील भरत महाराज, कुटुंबनायक रमेश पाटील, मसाका चेअरमन, शरद महाजन, उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, जिल्हा परीषद सदस्य पल्लवी सावकारे, नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर, नगरसेविका शोभा नेमाडे, समाजसेवक महेश पालक, सुधीर पाटील यांच्यासह नगरसेवक व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सानेगुरुजी अध्ययन केंद्र भुसावळच्या नूतनीकरणास सहकार्य करणार्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजे पासुन महाप्रसाद वितरण सोहळा होईल. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आपले परीवार सार्वजनिक वाचनालय व सदगुरू धनजी महाराज प्रतिष्ठानने केले आहे.