देशभरातील 80 संशोधकांची उपस्थिती
भुसावळ – शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात उमवि, जळगाव व रसायनशास्त्र विभागाच्या विद्यमाने 5 रोजी एक दिवसीय ‘रिसेंट ट्रेंडस् इन केमेस्ट्री अॅण्ड एन्व्हायरमेंट 2017’ या मल्टी डीसीप्लेनरी राष्ट्रीय परीषदेचे मंगळवारी सकाळी 11 वाजता प्रा.डॉ.के.जे.पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी आयसीटी मुंबईचे प्रा.डॉ.अनंत कापडी, महाविद्यालयाचे प्राचार्य आर.पी.फालक, समन्वयक डॉ.जी.पी.वाघुळदे आदींची उपस्थिती होती. दोन सत्रात होणार्या राष्ट्रीय परीषदेसाठी देशभरातील 80 संशोधक भुसावळच्या भूमीत दाखल झाले आहे.
80 शास्त्रज्ञांचे संशोधन पेपर प्राप्त
मंगळवारी येथे होत असलेल्या राष्ट्रीय परीषदेसाठी देशभरातील 80 नामवंत शास्त्रज्ञांचे संशोधकांनी आपले रिसर्च पेपर्स सादर केले. या परीषदेत ग्रीन केमेस्ट्री, ऑरगॅनिक केमेस्ट्री, अनॉलिटिकल केमेस्ट्री, पॉलीमर केमेस्ट्री, फिजीकल केमेस्ट्री, मेडीकल फार्मासिटीकल केमेस्ट्री, इलेक्ट्रो केमेस्ट्री, नॅनो टेक्नॉलॉजी, पॉप्युलेशन व वेस्ट मॅनेजमेंट, इकॉ-कॉन्झरवेशन, डिझास्टर मॅनेजमेंट, एनव्हायरमेंट अॅप्लीकेशन अॅण्ड इको टॉक्सीलॉजी या विषयांसोबत विविध शाखातील इंटर डिसीप्लीनरी आदी विषयांच्या प्राध्यापकांनी रिसर्च पेपर सादर केले. परीषदेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक, प्रा.डॉ.जे.पी.वाघुळदे, समन्वयक प्रा.डॉ.आर.बी.ढाके व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी झटत आहे.