भुसावळ- रीक्षातून घराकडे जात असलेल्या महिलेच्या पर्समधून दोघा भामट्या महिलांनी 36 हजार 500 रुपयांची रोकड लांबवल्याची घटना 11 रोजी दुपारी पावणेचार ते चार दरम्यान पांडुरंग टॉकीज ते सौभाग्य मंगल कार्यालयादरम्यान घडली. या प्रकरणी 22 ते 25 व 40 त 45 वयोगटातील दोघा अज्ञात महिलांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शोभा सुरेश पाटील (53, रा.मोरेश्वर नगर, हनुमान मंदिरासमोर, भुसावळ) ही महिला रीक्षातून मंगळवारी घराकडे जात असताना रीक्षातील दोघा अज्ञात महिलांनी त्यांचे लक्ष चुकवून पर्सला ब्लेड मारत त्यातील 36 हजार 500 रुपयांची रोकड लांबवली. तपास पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद कंक करीत आहेत.