भुसावळ : भुसावळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी व संचारबंदी जाहीर करण्यात आल्याने नागरीकांना घराबाहेर पडणे कठीण ठरले आहे. त्यातच विविध आरोग्याच्या समस्यांमुळे नाईवाईकांसह रुग्णांना जेवणाचा डबा संचारबंदीच्या काळात पोहोचवणे आणखीन अडचणीचे ठरत असताना भुसावळातील ररोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीने प्रशासनाची योग्य ती परवानगी घेऊन भुसावळ शहरातील विविध हॉस्पिटलमधे उपचार घेत असलेल्या मात्र जेवणाची गैरसोय होत असलेल्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय केली आहे. या संदर्भात माहिती आयएमएद्वारे कळवली जात असून गरजूंनी मदत लागल्यास संपर्क साधण्याचे आवाहनही रकण्यात आले आहे.
दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था
या उपक्रमात रुग्णासह नातेवाईकांना सकाळ व संध्याकाळ असे जेवणाचे पार्सल पोहचवण्यात येत आहे. सर्व प्रकारची आरोग्य बाबत काळजी घेऊन शुद्ध जेवण पोहचवले जात असून प्रोजेक्टच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष अनिकेत पाटील, सचिव मनोज सोनार व सर्व रोटेरीयन सदस्य प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, समाजातील सर्व स्तरातुन या उपक्रमाचे कौतुक होत आहे.