भुसावळ : कोरोना रुग्णांसाठी लागणार्या रेमडेसीव्हर इंजेक्शनची तब्बल 20 ते 25 हजारात विक्री करणार्या दोघांच्या बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीवरून मुसक्या आवळल्या आहेत. बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास बद्री प्लॉटमधील ओम पॅथालॉजीमध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी लॅब चालक विशाल शरद झोपे (28, बद्री प्लॉट, भुसावळ) 1व कर्मचारी गोपाळ नारायण इंगळे (18, मानमोडी, ता.बोदवड) यांना अटक करीत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, ईश्वर भालेराव, सचिन पोळ आदींच्या पथकाने केली. कारवाईदरम्यान दोन पंचांना सोबत घेण्यात आले तर एफडी निरीक्षक अनिल माणिकराव यांनी इंजेक्शनची तपासणी करून ते अधिकृत असल्याचे सांगितले.