20 दुकानांसह शंभर झोपड्यांची वीज कट ; रेल्वे सुरक्षा बलासह वीज विभागाची कारवाई
भुसावळ- रेल्वे हद्दीतील दुकानांसह झोपड्यांमध्ये अनधिकृतरीत्या वीज वापरणार्यांविरुद्ध रेल्वे प्रशासनाने मोहिम उघडली आहे. शनिवारी शहरातील चाळीस बंगला ते लिम्पस क्लब, आरपीडी रोड दरम्यान 20 दुकानदारांसह शंभर झोपड्यांमधील वीजपुरवठा कट करण्यात आला. रेल्वे सुरक्षा बल व रेल्वेच्या वीज विभागातार्फे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत रेल्वेचे एसएसई वाहिद खान, एसएसई रमेशचंद्र मीना, जेईई युवराज पाटील, जेईईट रजतसिंग ठाकूर यांच्यासह वायरमन व खलाशांचा सहभाग होता. रेल्वे सुरक्षा बलाचे लोकोचे निरीक्षक एस.के.पाठक, एएसआय एस.के.तिवारी, एएसआय करणसिंग, महिला कर्मचारी सुनीला परदेशी व अन्य कर्मचार्यांनी बंदोबस्त राखला.