भुसावळ : शहरातील बसस्थानकासमोरील रेल्वेच्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून ठाण बसून असलेल्या अतिक्रमिताना सोमवारी सकाळी प्रचंड पोलीस बंदोबस्तात बाहेर काढण्यात आले. चार दिवसांपूर्वीच अतिक्रमिताना बाहेर निघण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. सहा क्वार्टर्ससह 29 झोपडे दोन जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले. ही कारवाई रेल्वेचे डीई एम.एस.तोमर, एसएससी राजेंद्र देशपांडे, सचिन मुरलिधर यांच्यासह रेल्वे कर्मचार्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.