भुसावळ- शहरातील पंधरा बंगला भागातील रेल्वेच्या जीर्ण झालेल्या सुमारे 150 निवासस्थानांना पाडण्याचे काम गुरूवारपासून सुरू करण्यात आले. जीर्ण निवासस्थानांसोबतच जुने झालेले आऊट हाऊसही पाडले जात असल्याचे भुसावळ रेल्वे विभागाचे डीआरएम आर.के.यादव म्हणाले. जीर्ण निवासस्थाने पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे ठेकेदारांकडे ठेका दिला आहे. पंधरा बंगला परिसरातील जुने जीर्ण एमएपी टाईप आणि जीर्ण झालेले आऊट हाऊस तोडण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनातर्फे केले आहे. त्यानुसार गुरूवारपासून ही तोडण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. पंधरा बंगला भागातील जीर्ण निवासस्थाने तोडल्यानंतर चाळीस बंगला परिसरातील आऊट हाऊसदेखील तोडण्यात येणार आहेत. दरम्यान, चाळीस बंगला भागात अद्यापही काही जण त्या घरांमध्ये राहात आहे, त्युमळे त्या रहिवाशांना सुध्दा घरे रिकामे करून देण्याबाबत रेल्वे प्रशासनातर्फे सूचीत केले आहे.