भुसावळ : भुसावळ रेल्वेत गँगमन पदावर कार्यरत असलेल्या तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. माळी भवनाजवळील उड्डाणपुलावर रविवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला असून रात्री उशिरा बाजारपेठ पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अल्ताउद्दीन बशिरोद्दीन शेख (24) व शेख शरीफ शेख इद्रीस (25, दोन्ही रा.ग्रीन पार्क, भुसावळ) अशी मयत तरुणांची नावे असून दोघे तरुण रेल्वेत गँगमन पदावर कार्यरत असल्याची माहिती अपघातस्थावरून मिळाली. दरम्यान, अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला.
अपघातानंतर पोलिसांची धाव
बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत, सहा.हरीष भोये, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, सहा.निरीक्षक अनिल मोरे, रवींद्र बिर्हाडे, दीपक पाटील, समाधान पाटील, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार, कृष्णा देशमुख, चालक अय्याज सैय्यद आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवले. घटनास्थळी नगरसेवक पिंटू कोठारी, पिंटू ठाकूर, शेख आरीफ गनी आदींनी धाव मृतदेह पालिका रुग्णालयात हलवण्याकामी मदत केली.