भुसावळ– शहरातील सोमनाथ मंदिर परीसरातील चांदमारी चाळ भागातील रेल्वे कर्मचारी मो.सलीम इसराईल खान (57) यांचा गुरुवारी साडेसात वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तिघांनी निर्घृण खून केला होता. खुनानंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती तर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांना अटक केली आहे. दरम्यान अटकेतील आरोपींमध्ये भाजपा नगरसेवक पूत्राचा समावेश असून त्याच्यासह अन्य एका आरोपीला पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर शुक्रवारी रात्री उशिरा तिसर्या पसार झालेल्या आरोपीच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपींची ओळख परेड बाकी असल्याने त्यांची नावे सांगण्यास पोलीस सूत्रांनी नकार दिला.
जुन्या वादातून दुर्दैवी घटना
सोमनाथ मंदिर परीसरातील न्यू पोर्टर चाळीत रेल्वे कर्मचारी मो.सलीम इसराईल खान (57) हे आपल्या कुटुंबासह राहतात. गुरुवारी सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास तोंडाला रूमाल बांधलेले तिघे तरुण लाल रंगाच्या दुचाकीवर आले व त्यांनी अचानक खान यांच्यावर लोखंडी आसारीसह दगडाने हल्ला चढवला होता. डोक्यावर तसेच चेहर्यावर जबर वार झाल्याने खान यांचा अतिरक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला तर आरोपीने घटनेनंतर लागलीच पलायन केले. पोलिसांनी गुप्त माहितीनंतर नगरसेवकाच्या पूत्रासह अन्य दुसर्या आरोपीला अटक केली. या गुन्ह्यातील अन्य एक आरोपी पसार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांना घटनास्थळावरून वस्तरा जप्त केला असून आरोपींची पोलीस कोठडीचा हक्क राखून ठेवत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.