भुसावळातील तरुणाची आत्महत्या

0

तापी नदीच्या पुलावरून घेतली उडी ; आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

भुसावळ- शहरातील खळवाडी भागातील रहिवासी असलेल्या 25 वर्षीय तरुणाने तापी नदीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. भूपेंद्र बोंडें (25, खळवाडी, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. भूपेंद्र यांनी आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही.