विभागात मात्र आपत्कालीन स्थितीत सुरू राहणार आरक्षण केंद्र
भुसावळ- श्री गणेश चतुर्थीनिमित्त भुसावळातील आरक्षण केंद्र सकाळी आठ ते दोन नियमितरीत्या सुरू राहणार असून चार खिडक्यांद्वारे प्रवाशांना आरक्षित तिकीट काढता येणार आहे तर दुपारनंतर दोन ते आठ या दरम्यान केवळ एक तिकीट खिडकी रेल्वे प्रवाशांसाठी सुरू ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला मात्र भुसावळ विभागातील नाशिकसह अकोला, अमरावती व खंडवा वगळता अन्य स्थानकांवर आरक्षण खिडकी बंद ठेवण्यात येणार आहे. रेल्वे प्रवाशांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.