भुसावळात रेल्वे रनिंग स्टॉपच्या गणरायाला भक्तीभावाने निरोप

Farewell to the troublemaker of the railway running stop in Bhusawal after five days of celebrations भुसावळ : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात शहरातील रेल्वे रनिंग स्टॉपतर्फे गणरायांना निरोप देण्यात आला. रेल्वे रनींग स्टॉपतर्फे सीवायएम कार्यालयापासून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत रनिंग स्टॉपच्या कर्मचार्‍यांसह परीवारातील महिला, मुलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. महिलांनी लेझीम व विविध कसरतींचे प्रात्याक्षिक केले.

विविध कार्यक्रमांचे आयोजन
रनिंग स्टॉपतर्फे 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबररदरम्यान विविध कार्यक्रमांचे सीवायएम कार्यालयात आयोजन करण्यात आले. 1 रोजी स्टापसाठी आर्केस्ट्राचे श्रीकृष्णचंद्र सभागृहात आयोजन करण्यात आले. 2 रोजी सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले तर 3 रोजी रंगभवनात सकाळी नऊ ते सहा दरम्यान मुला-मुलींसह महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पाचव्या दिवशी रविवारी लेझीम खेळून गणरायाला विधीवत निरोप देण्यात आला.

यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
उत्सव यशस्वीतेसाठी ए.टी.खंबायत, आर.वाय.भोळे, ए.के.कुलकर्णी, पी.आर.पाटील, एन.डी.सरोदे, संदीप चौधरी, पी.पी.जंगले, व्ही.बी.हरणे, एम.पी.चौधरी, किरण धांडे, जे.एस.सोनवणे, सचिन वाघ, वाय.ए.कोल्हे, कुश झडगे, प्रकाश करसाळे, एस.आर.पाटील, जे.टी.बरकले, रूपेश गाजरे, द्रोणाल कोलते, सुरज महाजन, किसन सोनवणे आदींनी यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.