डी.के.शर्मा भुसावळ विभागाच्या दौर्यावर ; खंडव्यासह बर्हाणपूर रेल्वे स्थानकांची केली पाहणी
भुसावळ- मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी.के.शर्मा हे बुधवारी भुसावळ विभागाच्या दौर्यावर आले असून त्यांच्या हस्ते दुपारी 12.30 वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक तीनवरील रेल्वे सुरक्षा बलाच्या सीसीटीव्ही कंट्रोल रूमचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डीआरएम आर.के.यादव यांच्या हस्ते रेल्वेचे विविध विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी शर्मा यांनी रेल्वे स्थानकासह प्लॅटफार्मची पाहणीदेखील केली.
बर्हाणपूरसह खंडवा रेल्वे स्थानकाची पाहणी
सरव्यवस्थापक शर्मा हे बुधवारी मुंबईहून हावडा मेलने खंडवा येथे दाखल झाले. तेथील रेल्वे स्थानकासह प्लॅटफार्मची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर काशी एक्सप्रेसने ते खंडवा रेल्वे स्थानकावर दाखल झाल्यानंतर तेथेही पाहणी करण्यात आली. दुपारी ते भागलपूर एक्स्प्रेसने भुसावळात दाखल झाले. याप्रसंगी प्लॅटफार्म क्रमांक तीनवरील रेल्वे सुरक्षा बलाच्या सीसीटीव्ही कंट्रोल रूमचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. दरम्यान, सरव्यवस्थापकांसाठी विशेष सलून (कोच) असून त्याद्वारे त्यांनी तीनही ठिकाणी प्रवास केल्याचे सूत्रांनी सांगितले.